तोतया पोलिसाने महिलेवर केले अत्याचार

नायक वृत्तसेवा, राहाता
इन्स्टाग्रामवरून ओळख करून पोलीस भरतीमध्ये मदत करण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक करणार्‍या तोतया पोलिसाविरोधात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे यास पोलिसांनी अटक केली आहे.

शिर्डी येथील महिलेशी मिशो अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख तयार केली. या माध्यमातून आरोपीने महिलेशी मैत्री केली. पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र व छायाचित्र टाकून शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी जवळकीचे संबंध तयार केले. पोलीस भरतीत मदत करतो. तु नवर्‍याला सोडून माझ्याशी लग्न कर, असे सांगून महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, तोतया पोलीस असल्याचा पीडितेला संशय आल्याने तिने विचारणा केली. यावेळी आरोपीने महिलेस मारहाण केली. त्यानंतर पीडितेने राहाता पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पोलिसाचे बनावट ओळखपत्र, पोलीस पोशाख व छायाचित्र सापडले. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करत आहेत.

Visits: 86 Today: 1 Total: 1102113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *