सोनेवाडीमध्ये तीन एकर ऊस आगीत खाक

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील सोनेवाडी (चिंचमळा) येथे वीजवाहक तारांचे घर्षण होवून लागलेल्या आगीत तीन एकर ऊस आगीत खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शेतकरी भिवराज कारभारी राऊत यांनी आपल्या शेतात तीन एकरवर उसाची लागवड केलेली आहे. उसतोडही लवकरच होणार होती. परंतु, त्यापूर्वीच वीजवाहक तारांमध्ये घर्षण होवून ठिणग्या पडून उसाला आग लागली. क्षणार्धात आगीचे लोळ सर्वत्र पसरले. शेजारीच काम करत असलेल्या शेतकर्याने हे दृश्य पाहिले आणि संपर्क साधून भिवराज राऊत व त्यांच्या मुलांना माहिती दिली. त्यांनी आग विझविण्यासाठी संजीवनी कारखान्याच्या अग्निशमन बंबास पाचारण केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
Visits: 116 Today: 1 Total: 1112243
