मुळा धरण 94 टक्के भरले
मुळा धरण 94 टक्के भरले
नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी ता.29) 24 हजार 418 दशलक्ष घनपूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण 94 टक्के भरले आहे.
दरम्यान, 2 किंवा 3 सप्टेंबरला मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. कोतूळ येथून 5 हजार 638 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. कोतूळ येथे 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुळानगर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. धरणाचा सध्या 25 हजार 437 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. यावर्षीही धरण ओसंडून वाहू लागेल याची उत्सुकता शेतकर्यांत शिगेला पोहोचली आहे. धरण गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने ओव्हरफ्लो होत आहे.