कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्यच ः विखे निंभेरेत शिवजयंतीनिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान
![]()
नायक वृत्तसेवा, राहुरी
देशासाठी जात-धर्म विसरून सेवा करणारे सैनिक व कोरोना योद्धे यांचा सन्मान करणे आपले कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.

राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे शिवजयंतीनिमित्त पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार डॉ.सुजय विखे युवा मंच निंभेरे, मराठा उद्योजक लॉबी अहमदनगर व हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने व निंभेरे येथील युवा उद्योजक अमोल ढेपे यांच्या सहकार्यातून शिवजयंतीनिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयहिंद सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे, मराठा उद्योजक लॉबीचे मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे, कारखान्याचे संचालक उत्तम दिघे, लॉबीचे मार्गदर्शक अशोक कुटे, मनोहर सिनारे, सोसायटीच्या अध्यक्षा बेबी ढेपे, लॉबीचे नगर शहराध्यक्ष महेश आठरे आदी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते कोरोना योद्धा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी मराठा उद्योजक लॉबीची ब्रॅण्ड अम्बेसिडर सौम्या खरमाळे हिने शिवरायांवर आधारित पोवाडा सादर करुन सर्वांचेच लक्ष वेधले. शेवटी ढेपे कुटुंबियांमार्फत भोजन देण्यात आले. या सामाजिक कार्यक्रमासाठी लॉबीचे जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या व मराठा सोयरीक ग्रुपच्या संचालिका जयश्री कुटे, स्मिता इथापे, हिरा औटी, साईश चव्हाण, भीमराज हारदे, भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, रवींद्र चोभे, डॉ.मयुरेश कुटे, एकनाथ ढेपे, प्रताप कडू, सरपंच राजेंद्र सिनारे, विष्णू सिनारे यांसह ग्रामस्थ, लॉबीचे पदाधिकारी, जयहिंद सैनिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
