सुनील उकिर्डे सह्याद्री समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जयहिंद लोकचळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांना राज्यस्तरीय यशवंत वेणू प्रतिष्ठानच्या ‘सह्याद्री समाज भूषण पुरस्कारा’ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे, प्रांतपाल अभय शास्त्री, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, विभागीय कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे, शाखाध्यक्ष मुरलीधर साठे आदी उपस्थित होते. सुनील उकिर्डे हे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील रहिवासी असून सातत्याने जनतेच्या मदतीकरता तत्पर असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अपघातांमध्ये अनेक गरजूंना मदत केली असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे त्याचबरोबर प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होत तालुक्यात मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे. या पुरस्काराबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात आदिंनी अभिनंदन केले असून यशोधन कार्यालयातही त्यांचा आमदार तांबे यांनी सत्कार केला. यावेळी मनीषा उकिर्डे, गणपत पवार, कचरु पवार, उत्तम पवार, विजय पवार, सुभाष उकिर्डे, पोपट पवार, बाबासाहेब उकिर्डे, बाळासाहेब पवार, सतीश पवार, भाऊसाहेब पवार, अशोक उकिर्डे, हरिभाऊ पवार, प्रकाश पवार, साहेबराव पवार, माधव पवार आदी उपस्थित होते.