भाजप महिला आघाडीचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मकर संक्रांतीचे औचित्य साधून भाजप महिला आघाडी तर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभाला महिला-युवतींचा उदंड प्रतिसाद मिळाला.

संगमनेरातील व्यापारी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भाजपच्या शहराध्यक्षा प्राजक्ता बागुल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उदंड उत्साहात साजरा झाला. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ज्येष्ठ कारसेविका तथा माजी नगरसेविका पुष्पा मुळे, कांचन ढोरे, ज्योती भोर, सुरेखा खरे, कांचन मोंढे, निकिता परदेशी, अपर्णा मुळे, रेश्मा खांडरे, स्वाती कोळपकर, पूजा दीक्षित, उषा कपिले, कावेरी मुळे, अंजली जाखडी आदिंसह मोठ्या संख्येने मातृशक्तींची उपस्थिती होती. यावेळी महिलांची संगीत खुर्ची आणि उखाणे स्पर्धा खूपच रंगली. हळदी-कुंकू, वाण आणि कॉफीचा आस्वाद घेत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

Visits: 91 Today: 1 Total: 1106042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *