निवडणुकीच्या कामातून सूट मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामातून महिला, दिव्यांग आणि बीएलओ असलेल्या शिक्षकांना सूट मिळावी. यासाठी नुकतेच राहाता तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेने तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन दिले आहे.

राहाता तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कुंदन हिरे यांची समक्ष भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महिला शिक्षिकांना दिली जाणारी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती रद्द करावी, मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामातून सूट द्यावी, महिला शिक्षिकांना फक्त मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून नियुक्ती द्यावी, महिला शिक्षिकांना स्वतःच्या राहत्या गावात किंवा गावाजवळ निवडणूक कर्तव्य द्यावे, दिव्यांग बांधवांना व बीएलओ म्हणून कार्यरत असणार्‍या तसेच आजारी, दीर्घ रजेवरील प्राथमिक शिक्षकांना व स्तनदा माता शिक्षिकांना आलेले नियुक्ती आदेश रद्द करावेत, मतदान कर्मचारी-अधिकारी असणार्‍या कर्मचार्‍यांना मतदान करण्यासाठी वेळ द्यावा आदी मागण्यांचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस दत्ता गमे, तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड, गुरुमाऊली मंडळ तालुकाध्यक्ष सुधाकर अंत्रे, कार्याध्यक्ष विनोद तोरणे, जिल्हा उपाध्यक्ष संजय वाघमारे, उच्चाधिकार समिती तालुकाध्यक्ष चंद्रकांत महांडुळे, बाजीराव बनसोडे, पंकज दर्शने, रामकिसन आसावा, राजू बनसोडे, शांताराम शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 50 Today: 1 Total: 437943

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *