नांदेड घटनेप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे तहसीलदारांना निवेदन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नांदेड येथील एका विवाह समारंभात वीरशैव लिंगायत धर्माचार्य डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड व डॉ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर यांना बसव ‘तुम्ही लिंगायत समाजाला हिंदू असल्याचे का सांगता?’ म्हणून ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिष्यांनाही मारहाण केली. या प्रकाराबाबत आज (गुरुवार ता.31) संगमनेरातील विश्व हिंदू परिषदेने तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनात म्हंटले आहे की, हा प्रकार संपूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह आहे. यापूर्वीच्या राज्यात साधू, संतांवरील झालेल्या हत्येच्या घटना पाहता हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. समाज माध्यमांवरही धर्माचार्यांबद्दल नेहमीच अभद्र टिप्पण्या केलेल्या आहेत. यामुळे नुसत्या वीरशैव लिंगायत समाजाच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून प्रशासनाने तात्काळ संबंधितांना अटक करुन कडक कारवाई करावी, असे तहसीलदार अमोल निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सचिन कानकाटे, अश्विन बेल्हेकर, विहिंपचे विशाल वाकचौरे आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 42 Today: 1 Total: 403953

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *