राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचा कोरोना विषाणूंनी घेतला बळी

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचा कोरोना विषाणूंनी घेतला बळी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा महिला नगरसेविकेच्या पतीस अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील कोरोना केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घाटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी (ता.25) दुपारी कोरोना विषाणूंनी त्यांचा बळी घेतला आहे.


कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत एकूण 3 हजार 369 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. 25 ऑगस्टपर्यंत एकूण 709 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 176 रुग्ण सक्रीय आहेत. तर 14 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. दरम्यान, मंगळवारी 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना उपचारांती सुट्टी देण्यात आली आहे. 91 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात 24 बाधित अहवाल आले आहेत. तर 67 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये महादेवनगर एक, संजयनगर, मुर्शतपूर येथे प्रत्येकी 2, तर सुभद्रानगर, येवला रस्ता, टाकळी, बागूल टॉवर, इंदिरापथ येथील प्रत्येकी 1, समतानगर 4, ब्रिजलालनगर 1, धारणगाव, कोकमठाण, श्रद्धानगरी येथे प्रत्येकी 2, संवत्सर, बाजारतळ, सुभाषनगर येथे प्रत्येकी 1 असे 24 बाधित रुग्ण आढळले आहेत.

Visits: 153 Today: 1 Total: 1986433

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *