साळीवाडा खंडोबा मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तीन दिवस सुरु होते अनुष्ठान; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील साळीवाड्यात असलेल्या स्वयंभू खंडोबारायाच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात आज नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून या मंदिराच्या प्रांंगणात विविध धार्मिक अनुष्ठान केले जात असून आज महाआरती व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने त्याची सांगता झाली. खंडोबारायांच्या षड्रात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून साळीवाड्यातील या मंदिरात धार्मिक उत्सव सुरु असून दररोज दोनवेळच्या आरतीसाठी शेकडो भाविकांसह गेल्या दहा दिवसांत हजारो भाविकांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले आहे. आजपासून नूतन मंदिरात प्रतिष्ठापना झालेल्या खंडोबारायांसह म्हाळसादेवी व बाणूबाईंचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबारायावर श्रद्ध असलेला खूप मोठा वर्ग संगमनेरात आहे. सुमारे पाच दशकांपूर्वी दिवंगत रामनाथ पडताणी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भगवंताने दृष्टांत देवून साळीवाड्यात असलेल्या आडातून बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार पडताणी यांनी सदरील आड उकरले असता त्यातून खंडोबारायाची मूर्ती बाहेर निघाली. त्या मूर्तीची आडाच्या काठावरच छोटेखानी मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून याच मंदिरात दरवर्षी विविध सण-उत्सवांसह चंपाषष्टी हा खंडोबारायांचा वर्षातील मोठा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.

येथील खंडोबा देवस्थानाचेव् यवस्थापन पाहण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर भाविकांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात आले. सद्यस्थितीत साळीवाड्यातील खंडोबारायांच्या मंदिराचे काम पूर्ण झाले असून गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धार्मिक अनुष्ठानांनानंतर आज विधीवतपणे गर्भगृहाच्या बाह्यबाजूस श्री गणेश, महाबली हनुमान व आतील बाजूस मधोमध खंडोबारायांच्या देखण्या आणि भव्य मूर्तीसहत्यांच्यादोन्ही बाजूलाअनुक्रमे म्हाळसादेवी आणि बानूबाई यांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

Visits: 354 Today: 1 Total: 2057655

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *