आपण भाजपमध्येच खूष आहोत : पिचड

नायक वृत्तसेवा, अकोले
मी यापूर्वीच सांगितले आहे, आजही सांगतो, आपण भाजपमध्ये खूष आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. मध्यंतरी एका वृत्तवाहिनीवर भाजपमध्ये गेलेले पुन्हा राष्ट्रवादीत येणार त्यात माजी आमदार वैभव पिचड यांचाही नामोल्लेख होता. याबाबत पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद असता त्यांनी स्पष्ट शब्दांत बातमीचा इन्कार करुन आपण भाजपमध्येच खूष असल्याचे ठासून सांगितले.

संवाद साधताना माजी आमदार पिचड पुढे म्हणाले, आपला असा कोणताही पक्ष बदलाचा विचार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांची देश व राज्य हितासाठी चाललेली धडपड विकासाचे व्हिजन यामुळे मी त्यांच्या नेतृत्वावर खूष आहे. गाव तिथे भाजप शाखा, बूथ ही कामे माझे तरुण कार्यकर्ते करत आहेत. तर नुकताच गोवारी प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष्य घालून आदिवासी समाजाला न्याय हकक मिळवून दिला आहे. कोरोना संकटात मोफत धान्य, शेतकर्‍यांच्या खात्यावर निधी, महिलांना मोफत गॅस या योजना केंद्र सरकार व भाजप सरकारने दिल्या आहेत. गरिबांना अडचणीच्या काळात मदत करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Visits: 88 Today: 1 Total: 1109377

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *