शुक्रवारी कोविड रुग्णसंख्येत झाली किंचित घट! शहरातील आठ जणांसह एकूण चौतिस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कोविड संक्रमणात दररोजचा चढ-उतार कायम असून गुरुवारी फुगलेली रुग्णसंख्या शुक्रवारी पुन्हा काहीशी मागे सरली. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून चढाला लागलेल्या रुग्णगतीत काहीशी घटही नोंदविली गेली. शुक्रवारी खासगी प्रयोगशाळेचे नऊ, शासकीय प्रयोगशाळेचा एक आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून 24 जणांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह प्राप्त झाले. गुरुवारी 45 रुग्णसंख्येचा धक्का बसल्यांतर काल समोर आलेली रुग्णसंख्या कमी असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला. कालच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील आठ तर ग्रामीणभागातील 26 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही भर पडून आता तालुका 5 हजार 360 वर पोहोचला आहे.


संभाव्य दुसरी लाट वेगाने पसरेल असा सुरुवातीचा कयास असतांना तुलनेत संगमनेर तालुक्यातील रुग्णगती नियंत्रणातच आहे. त्यातच देशातंर्गत लस तयार करणार्‍या कंपन्यांना तिसर्‍या चाचणीची परवानगीही मिळाल्याने येत्या महिनाभरात भारतात प्रत्यक्ष लसिकरणाला सुरुवात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. मात्र जोपर्यंत प्रत्यक्ष लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोविडबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन होणं आवश्यक आहे.


शुक्रवारी (ता.4) प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील आदर्शनगर वसाहतीमधील 80 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 52 व 46 वर्षीय इसम, इंदिरानगर मधील 40 वर्षीय तरुण, घोडेकरमळ्यातील 30 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, पडताणी कॉम्लेक्समधील 35 वर्षीय तरुण व भारतनगर मधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील आश्‍वी खुर्दमधील 50 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्दमधील 21 वर्षीय महिला, हिवरगाव पठार भागातील 40 वर्षीय तरुण.


नंदूर खंदरमाळ येथील 64 व 62 वर्षीय ज्येष्ठांसह 55 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 30 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 39 वर्षीय तरुण, चिखली येथील 65 व 48 वर्षीय इसम, राजापूर येथील 30 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 48 वर्षीय महिला, लोहारे येथील 35 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 41 वर्षीय महिला, चनेगाव येथील 35 वर्षीय तरुण, सोनुशी येथील 54 वर्षीय इसमासह 35 व 20 वर्षीय तरुण.


कोकरेवाडी येथील 75 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 44 वर्षीय इसम, डिग्रेस येथील 45 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 74 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचोली गुरव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व कनोली येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 34 जणांना कोविडची लागण झाल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडून एकूण रुग्णसंख्या 5 हजार 360 वर पोहोचली आहे.

Visits: 263 Today: 1 Total: 1800794

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *