नगराध्यक्षांनी विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडू नये ः निखाडे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनाला अपेक्षित नसताना शहरातील विस्थापितांसह सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळे नगराध्यक्षांची विस्थापितांच्या प्रश्नावर मोठी कोंडी झाल्याने विस्थापितांमध्ये संभ्रम निर्माण करुन दुटप्पी धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करणार्‍या नगराध्यक्षांनी विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडू नये, अशी खणखणीत कानउघडणी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केली आहे.

कोपरगाव शहरातील आरोग्य, पाणी, रस्ता यांसह कोणताही प्रश्न असो तो सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणतेही राजकारण, विरोध न करता सभागृहातील सर्व विषयांना सहमती देवून विषय मंजूर केले. विस्थापितांच्या प्रश्नावर सभागृहात नगराध्यक्षांनी षड्यंत्र करुन विस्थापितांच्या विषयात अडथळा आणला. परंतु नगरसेवकांनी ते अडथळे बाजूला करुन विस्थापितांच्या प्रश्नाला मंजुरी देत ठराव केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्षच जनतेचे राहिलेले नाही, जनतेचे प्रश्न मार्गी न लागता जनतेची कशा पद्धतीने दिशाभूल करता येईल यातच नगराध्यक्ष व्यस्त असल्याची टीका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *