भोजापूर धरणातून आणलेल्या पाईपलाईनमुळे पाणीप्रश्न कायमचा सुटेल ः थोरात

भोजापूर धरणातून आणलेल्या पाईपलाईनमुळे पाणीप्रश्न कायमचा सुटेल ः थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या हस्ते निमोण पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना पाणी पुरवठा होणार असल्याने या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.


कर्‍हे फाटा खंडोबा मंदीर येथे मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या भोजापूर धरणातून पाच गावांना पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, बी.आर.चकोर, जिल्हा परिषद समितीच्या सभापती मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, आर.बी.रहाणे, अ‍ॅड.ज्ञानेश्वर सांगळे, गणपत सांगळे, विष्णू ढोले, नवनाथ अरगडे, रोहिदास सानप, संपत गोडगे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अर्चना बालोडे, संतोष हासे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम.जी.सराफ, उपअभियंता एम.बी.क्षीरसागर, शाखा अभियंता अशोक लोणारे आदी उपस्थित होते. निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेड या 5 गावांसाठी 15 किलोमीटरची पाईपलाईन करण्यात आली असून, थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. भोजापूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही पूर्णत्वास येत आहे.


याप्रसंगी महसूल मंत्री थोरात म्हणाले, यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. निमोण-तळेगाव परिसरातही चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. तळेगाव परिसरातील गावांसाठी प्रवरा नदीवरून थेट पाईपलाईन योजना आणली तिचे पाणी देवकौठेपर्यंत मिळत आहे. ही योजना 16 गावांना पाणी पुरवत आहे. या योजनेप्रमाणेच निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या 5 गावांचा पाणीप्रश्न या प्रादेशिक योजनेमुळे मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे या गावांना पाणी उपलब्ध होणार असल्याने वीजेच्या खर्चातही बचत होऊन नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल, असा विश्वासत त्यांनी व्यक्त केला.


यावेळी पाणी पुरवठा योजनेची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी अनिल घुगे, मोहनराव करंजकर, विलास कवडे, बाबासाहेब कडनर, पांडूरंग फड, गंगाधर जायभाये, पांडूरंग गोमासे, तुकाराम सांगळे, राजू सानप, किसन पाटील, सुभाष सानप, चंद्रकांत घुगे, साहेबराव आंधळे, ज्ञानेश्वर घुगे, जबाजी मंडलिक, सुदाम गायकवाड, ज्ञानेश्वर कांडेकर, भीमा कांडेकर, शंकर लहारे, तात्याराम कुटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *