संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 44 वे शतक..! ग्रामीण क्षेत्रासह शहरातील रुग्ण गतीतही आज झाली मोठी वाढ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चालू महिन्याच्या सुरुवातीपासून तालुक्यातील संक्रमणात घट झाल्याचे चित्र दिसत असताना, आज मात्र धक्कादायक पद्धतीने पुन्हा एकदा अडतीस रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शहरी रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी आज काही प्रमाणात भरतीत परावर्तित झाली. त्यामुळे शहरी रुग्णसंख्येतही आजच्या एकूण रुग्ण संख्येतील जवळपास 25 टक्क्यांहून अधिक रुग्णांची भर पडली. आजच्या एकूण 38 रुग्ण संख्येपैकी तब्बल 11 रुग्ण एकट्या संगमनेर शहरातून समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याने बाधितांचे 44 वे शतक ओलांडले असून रुग्णसंख्या 4 हजार 405 वर पोहोचली आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून अकरा जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 27 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात शहरातील विद्यानगर परिसरातून एकाच कुटुंबातील पाच जणांसह शहरातील अकरा जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे प्राप्त झाले आहेत. त्यात विद्यानगर परिसरातील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 व 19 वर्षीय तरुण, तसेच 74 व 38 वर्षीय महिला, घासबाजारातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनता नगर परिसरातील 51 वर्षीय इसम, गणेश नगर परिसरातील 51 वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन परिसरातील 38 वर्षीय तरुण व सावतामाळी नगर परिसरातील 55 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

यासोबतच तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील 55 व 50 वर्षीय इसमासह 39 वर्षीय तरुण, तसेच 40 व 18 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 36 वर्षीय तरुण, खराडी येथील 35 वर्षीय तरुण, राजापूर येथील 55 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण व 17 वर्षीय तरुणी, मंगळापुर येथील 15 वर्षीय मुलगा, जोर्वे येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36 वर्षीय तरुण व 55 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण, 28 वर्षीय महिला व पाच वर्षीय बालक, तसेच शिवारातील साई श्रद्धा चौकातील 28 वर्षीय तरुण.

गुंजाळवाडी येथील 53 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला, माळेगाव पठार येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सुकेवाडी येथील 29 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 38 वर्षीय तरुण, करुले येथील 60 वर्षीय महिला, दाढ बुद्रुक येथील 32 वर्षीय तरुण व डोळासणे येथील 24 वर्षीय महिलेला संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या एकूण अहवालातून शहरातील 11 तर ग्रामीण क्षेत्रातील 27 जणांसह एकूण 38 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आजच्या रुग्णसंख्या वाढीने तालुक्याने बाधितांचे 44 वे शतक ओलांडून 4 हजार 405 रुग्णसंख्या गाठली आहे.

