साईबाबांच्या दर्शनाने मनाला समाधान : अभिनेत्री शिल्पा शेट्टी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांचे बोलवणं आलं की, मी लगेच शिर्डीला येते. साईबाबा माझी कायम आठवण ठेवतात आणि मला त्यांच्या दर्शनासाठी बोलावतात. हे माझं भाग्य आहे. आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान आणि आनंद वाटला असल्याचे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बहीण शमिता शेट्टीसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर दोघींनी साईबाबांच्या धुप आरतीतही सहभाग घेतला. यावेळी साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आणि प्रशांत सूर्यवंशी यांनी शिल्पा शेट्टी यांचा शॉल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.

साई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिल्पा शेट्टी म्हणाल्या, साईबाबांचे बोलवणं आलं की, मी लगेच शिर्डीला येते. साईबाबा माझी कायम आठवण ठेवतात आणि मला त्यांच्या दर्शनासाठी बोलावतात. हे माझं भाग्य आहे. सध्या कोणतीही अडचण नाही. हातपाय काम करत आहे, शरीर तंदुरुस्त आहे. अडचणींचा काळ तोच असतो, जेव्हा मन अस्वस्थ असतं. पण माझ्याबरोबर साईबाबा आहेत, त्यामुळं कुठलीच अडचण नाही. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे. जो कोणी साईबाबांवर विश्वास ठेवून श्रद्धा आणि सबुरी बाळगतो. त्याचं प्रत्येक काम साईबाबा पूर्ण करतात. कारण साईबाबा आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. असेही यावेळी शिल्पा शेट्टीनं सांगितले. पुढं तिनं म्हटलं, साईबाबा मला मागण्याआधीच सगळं काही देतात. त्यामुळं आज मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीत आली आहे.

Visits: 186 Today: 5 Total: 1110174
