चणेगावात नंदी ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक उत्साहात!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चणेगाव येथील पुरातन श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांच्या सहभागातून काढण्यात आलेली नंदी ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक उत्साहात पार पडली.श्रावण मासातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधत निघालेल्या या मिरवणुकीत भाविक भक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत परीसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.मिरवणुकीच्या अग्रभागी पताकाधारी,कावडधारी,कलशधारी, पारंपरिक वाद्ये,भजनी मंडळ, महिला, पुरुष सहभागी झाले होते.मिरवणुक समारोपानंतर शाबुदाना खिचडी व केळी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

दरम्यान येथील रामेश्वर देवस्थानच्या पिंड व नंदीचा जिर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवार दि.१३ जुलै रोजी कलाकर्षण विधी, सोमवार दि.२८ रोजी नंदी मिरवणूक गाव दर्शन, मंगळवार दि.२९ जुलै रोजी प्राणप्रतिष्ठा विधी आणि बुधवार दि.३० जुलै रोजी सकाळी श्री क्षेत्र रामेश्वर मठाचे बालब्रह्मचारी दत्तगिरी महाराज यांचे जाहीर हरिकिर्तन पार पडले त्यानंतर महाप्रसाद होऊन या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली.

Visits: 144 Today: 3 Total: 1104252
