निरोगी समाजासाठी विषमुक्त शेतीची गरज : माजी आ. डॉ. तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत हा कृषिप्रधान देश आहे, मात्र शेतीला शाश्वत हमीभाव नसल्याने शेती तोट्यात आहे. सरकारने शेतीसाठी ठोस धोरण जाहीर करण्याची गरज असून शेतकर्यांनी पारंपारिक पद्धतीने जास्त रासायनिक खतांचा वापर न करता विषमुक्त शेती करता सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. लहान मुलांची जसे आपण संगोपन करतो, तशी पिकांची काळजी घ्या असे आवाहन माजी आ.डॉ सुधीर तांबे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील मनोली येथे देहात ऍग्रो इंडस्ट्रीच्या नवीन उपकरणांच्या साह्याने शेतीमध्ये प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.
जयश्री थोरात, बाबा ओहोळ, बाबासाहेब शिंदे, केशव शिंदे, डॉ. नरेश शेजवळ, डॉ. गंगाधर चव्हाण, विशाल राजेभोसले, दिग्विजय सिंग, कार्तिक नायर, प्रभाकर बेंद्रे, अभिजीत बेंद्रे, शरद बेंद्रे, संकेत बिडवे, सुनील बेंद्रे, अभिषेक क्षिरसागर, शरद बेंद्रे, संजय बिडवे, रामनाथ शिंदे, अण्णासाहेब शिंदे, महेश जोंधळे, गगन थोरात, यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, शेतकरी हे भारताचे मूळ आहे. तरुणांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले आणि त्यामध्ये अत्याधुनिक प्रयोग केले तर नक्कीच शेती परवडणारी होणार आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.

यावेळी बाबा ओहोळ, नरेश शेजवळ, दिग्विजय सिंग यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. गंगाधर चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर अभिजीत बेंद्रे यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतावर प्रत्यक्ष फवारणीद्वारे विविध प्रात्यक्षिके करून शेतकर्यांना आधुनिक प्रणालीची माहिती देण्यात आली.

