शहरात आजपासून चार दिवस खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर 
 आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू केलेल्या ‘आय लव संगमनेर’ चळवळीच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने  शहरांमध्ये आज बुधवार दि. २४ सप्टेंबर ते शनिवार दि.२७ सप्टेंबर या चार दिवसात दररोज रात्री ७ ते १० या वेळेमध्ये महिलांसाठी मैत्रीचा व आनंदाचा सोहळा खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ.मैथिली तांबे यांनी दिली.

खेळ पैठणीचा या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉ.मैथिली तांबे म्हणाल्या की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हे विकासातून वैभवशाली ठरले आहे. संगमनेरला मोठी सांस्कृतिक परंपरा असून ही समृद्ध परंपरा जपण्यासाठी सौ शहरी एक संगमनेरी हे ब्रीद वाक्य असलेली आय लव संगमनेर ही चळवळ काम करत आहे.

नवरात्र महोत्सव हा महिलांच्या सन्मानाचा असून महिलांचे हे आनंदाचे पर्व आहे. या कालावधीमध्ये खेळ पैठणीचा हा मैत्रीचा व आनंदाचा सोहळा संगमनेर शहरात बुधवार दि.२५ सप्टेंबर  ते शनिवार दि.२७ रोजी रात्री सात ते दहा या वेळेमध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे,  डॉ.जयश्री थोरात, डॉ.मैथिली तांबे उपस्थित राहणार आहेत.

या खेळ पैठणी कार्यक्रमाध्ये विविध खेळ, मजेदार स्पर्धा प्रश्न, उत्तर आणि लकी ड्रॉ असणार असून सहभागी आणि उपस्थित सर्वांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजेशाही पैठणी, गृह उपयोगी वस्तू व आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत.

तरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या  खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये शहरातील जास्तीत जास्त महिला व तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन आय लव संगमनेर, जयहिंद महिला मंच,  एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Visits: 150 Today: 1 Total: 1098410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *