फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनची सभा सालाबादप्रमाणे यावर्षी अतिशय खेळीमेळेच्या वातावरणात नुकतीच पार पडली. यावेळी अध्यक्षपदी रवी शिंदे, उपाध्यक्षपदी नीलेश मिसाळ यांची तर सहसचिवपदी राम दारोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

प्रारंभी संस्थेचे सदस्य फोटोग्राफर अनिल नवले यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झालं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात झाली. यावेळी फोटोग्राफर यांना कोरोनामुळे आलेल्या अडचणी कशा सोडविता येतील याविषयी सकारात्मक चर्चा झाली. तसेच नवीन अध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आली. संघटनेचे मावळते अध्यक्ष संतोष नाईकवाडी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रवी शिंदे यांच्याकडे कार्याची धुरा सोपवली. तर उपाध्यक्ष म्हणून नीलेश मिसाळ यांची निवड करण्यात आली. यासोबतच गोपाल बोर्‍हाडे यांची सचिवपदी तर राम दारोळे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. ओंकार कोदे, संतोष डुबे, श्रीहरी कडलग, साई दिघे, अक्षय कोटकर, सतीश खताळ, शहाजी काळे, राजू गुळवे, राजू गाडेकर, परशुराम काठे, संदीप शेळके, जयदीप गुंजाळ, नितीन खाटेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. संघटनेचे ज्येष्ठ सभासद राम भागवत, काशिनाथ गोसावी, संतोष नाईकवाडी, किरण डोंगरे, ओंकारनाथ राठी, श्री.ठाणेकर, श्री.राऊत, शांताराम कोल्हे, सतीश गोरे आदिंनी मार्गदर्शन केले. नूतन कार्यकारिणीचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 

Visits: 177 Today: 1 Total: 1879872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *