श्री श्री रविशंकर विद्यामंदिर मध्ये योग दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुमेरु एज्युकेशन सोसायटी संचलित श्री श्री रविशंकर विद्यामंदिर मध्ये जागतिक योग दिन व २०२४- २५ मधील ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सोहळा यशवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव समीर शाह, संस्थापिका स्वाती शाह, प्राचार्या आरती सप्रा, प्री प्रायमरी इन्चार्ज दीपलक्ष्मी सोमानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. योग शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देते. नियमित योगा केल्याने शरीराचे व मनाचेही आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. संपूर्ण जगाला याचा फायदा व्हावा व मानवी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित करण्यात आले. इयता आठवीची विद्यार्थिनी स्वरा पानसरे तसेच इयत्ता नववीचा विद्यार्थी अथर्व सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आराध्या धात्रक हिने योग दिनाची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका वायकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

श्री श्री रविशंकर यांनी सगळ्या जगाला जीवन जगण्याची कला योग, प्राणायाम, ध्यान, यातून सांगितली आहे. शालेय विद्यार्थ्यांनासाठी देखील त्यांनी, उत्कर्षयोगा, मेधा योगा, एस कोर्सच्या माध्यमातून ही साधना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. श्री श्री रविशंकरचे विद्यार्थी नियमितपणे साधना, ध्यान, योगा, प्राणायाम करत असतात आणि त्याचे परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, सृजनशीलता, श्रवणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्तीत निश्चित वाढ झालेली दिसते.

Visits: 126 Today: 1 Total: 1103889
