बंदुकीतून फायर करणाऱ्या दोघांना बेड्या! स्थानिक गुन्हे शाखेने घेतले पुणे येथून ताब्यात
नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
शहरातील तपोवन रस्त्यावर एका तरुणावर रात्रीच्या सुमारास गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९३/२०२५ बी. एन. एस. २०२३ चे कलम १०९(१), ११५(२), ३५२, १८९ (२) (४),१९१ (२) (३), सह आर्म ऍक्ट कलम ३/२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील ३ आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. परंतु या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळुन गेले होते. या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अंमलदार यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी पथकास रवाना केले होते. रविवार दि.१५ जून रोजी पथक गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी भिमराज आव्हाड व राहुल सांगळे हे केसनंद, ता. जि.पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे या ठिकाणी जावुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असतांना ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, अशोक लिपणे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांनी केली.

आरोपी भिमराज गेणुजी आव्हाड याच्या विरुध्द यापुर्वी मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल असुन तो सदर गुन्ह्यातुन जामीनावर आहे. तसेच दुसरा आरोपी राहुल विजय सांगळे याच्या विरुध्द दंगा, मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Visits: 154 Today: 2 Total: 1115342
