लिफ्ट योजना सुरू ठेवण्यासाठी चोपडे यांचे योगदान : म्हसे

नायक वृत्तसेवा, आश्वी
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथुन निमगावजाळी गावासाठी पाण्याची लिफ्ट योजना सुरू आहे.अनेकदा स्थानिक ग्रामस्थांनी लिफ्ट योजना सुरू होण्यासाठी विरोध केला.पण राधाकृष्ण चोपडे यांनी लाभार्थी शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांशी मध्यस्थी करत लिफ्ट योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला तसेच ती नियमित सुरू राहण्यासाठी ही त्यांचा पुढाकार होता, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय म्हसे यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अतंर्गत येणाऱ्या आश्वी बुद्रुक- निमगावजाळी लिफ्ट योजनेचे कर्मचारी राधाकृष्ण चोपडे हे त्यांच्या  ४४ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विजय म्हसे बोलत होते. यावेळी आर.डी. कदम,रंगनाथ उंबरकर,तुळशीराम म्हस्के,डॉ. दिनकर गायकवाड,पोपट उबंरकर,भागवत उंबरकर,सुरेश भुसाळ,रामभाऊ भुसाळ,बाळासाहेब उंबरकर,बाळासाहेब दिघे,भारत तांबे,प्रकाश खेमनर,संपत उंबरकर,गंगाधर गायकवाड,दिपक सोनवणे,किरण गायकवाड,इंजिनियर अभिजीत म्हसे ,पत्रकार वैभव ताजणे,पुलाटे,धनवटे,जाधव सह  शेतकी ऑफिस कर्मचारी, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलतांना म्हसे म्हणाले की,ही लिफ्ट योजना नियमीत सुरळीत सुरू ठेवण्यामागे राधाकृष्ण चोपडे यांचे मोठे योगदान आहे.चोपडे यांनी ४४ वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये अनेक निवडणुकीमध्ये विखे परीवाराने टाकलेली जबाबदारी चोख पार पाडली. कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या दोन्ही निवडणुकीचे ते साक्षीदार आहेत. यापुढे ही चोपडे यांनी जनसेवा संघटनेसाठी आपला वेळ द्यावा आणि मिळेल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार रहावे असे आवाहनही  विजय म्हसे यांनी यावेळी केले.
नोकरीत असताना स्व. माजी खा.बाळासाहेब विखे पाटील,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार विखे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणुक काळामध्ये प्रचारा दरम्यान विविध जबाबदाऱ्या मिळाल्या, व त्या चोख पार पाडण्याचा प्रयत्न केला. भविष्यात ही, संघटनेमध्ये जी जबाबदारी मिळेल ती पुर्ण ताकदीने पुर्ण करणार असल्याचे राधाकृष्ण चोपडे यावेळी म्हणाले.
Visits: 118 Today: 1 Total: 1982300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *