धुमाळवाडी येथे बंगला फोडून चोरी

धुमाळवाडी येथे बंगला फोडून चोरी
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याचा पठारभाग नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता पुण्याला स्थायिक असणार्‍या धुमाळवाडी येथील देशमुख कुटुंबियांचा बंगला सोमवारी (ता.26) रात्री अज्ञाताने फोडून मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत देशमुख यांनी तिसर्‍यांदा चोरी झाल्याचा तक्रार अर्ज घारगाव पोलिसांना दिला आहे.

या तक्रार अर्जात बाळासाहेब माधव देशमुख यांनी म्हंटले आहे की, पुण्याला वास्तव्यास असल्याने धुमाळवाडी येथील बंगला बंद असतो. याच संधीचा फायदा अठवत चोरट्याने बंगला फोडून मुद्देमाल लांबविला आहे. यापूर्वी देखील चोरी झाल्याबाबतची तक्रार घारगाव पोलिसांनी दाखल करुन घेतली नाही. त्यावेळस पेन ड्राईव्हमधील सीसीटीव्हीचे फुटेज देखील पोलिसांना दिले होते. मात्र अद्यापही तपास लागलेला नाही. आता तरी पोलिसांनी लक्ष घालून चोरीचा तपास लावावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

 

Visits: 115 Today: 1 Total: 1111420

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *