जिल्ह्यातील दुय्यम पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या! पंचवीस सहायक तर अठरा उपनिरीक्षक; दाभाडेंसह जाधव, महाले, पतंगे नगरला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी कालावधीतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच असून पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर आता पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील दुय्यम पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील २५ सहायक निरीक्षकांसह १८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील तिघांसह घारगाव पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक कल्पेश दाभाडे यांना नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले असून त्यांच्या जागी कोतवालीचे विश्वास भान्सी यांना पाठवण्यात आले आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या असून त्यानुसार ज्या पोलीस अधिकार्‍यांचा कार्यरत पोलीस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा अधिकार्‍यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्यांचे आदेश बुधवारी (ता.२४) बजावण्यात आले आहेत. त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कल्पेश दाभाडे यांना नियंत्रण कक्षात पाचारण करण्यात आले असून त्यांच्या जागी कोतवालीचे विश्वास भान्सी यांना संगमनेरला पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निकिता महाले यांना अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे, निवांत जाधव यांना अहमदनगरच्या नक्षल सेल व घारगावच्या उमेश पतंगे यांना नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे.

सहायक निरीक्षक राजेंद्र इंगळे (साई मंदिर सुरक्षा ते शिर्डी वाहतूक शाखा), सोपान काकड (नव्याने हजर ते राहाता), खगेंद्र टेंभेकर (नव्याने हजर ते शनिशिंगणापूर), सतीष घोटेकर (नव्याने हजर ते साई मंदिर सुरक्षा), सोमनाथ दिवटे (मिरजगाव ते आर्थिक गुन्हे), राजू लोखंडे (राहुरी ते जिल्हा विशेष शाखा), महेश येसेकर (कोपरगाव ते शिर्डी वाहतूक), रवींद्र पिंगळे (कोतवाली ते राहुरी), नितीन रणदिवे (तोफखाना ते पाथर्डी), विश्वास पावरा (तोफखाना ते कोपरगाव शहर), प्रमोद वाघ (पारनेर ते नेवासा), रामेश्वर कायंदे (पाथर्डी ते शिर्डी), महेश जानकर (खर्डा ते कोतवाली), प्रशांत कंडारे (शिर्डी ते शेवगाव), संभाजी पाटील (शिर्डी ते पारनेर), योगिता कोकाटे (शिर्डी ते कोतवाली), प्रवीण दातरे (राजूर ते तोफखाना),

रामचंद्र करपे (भरोसा सेल ते अहमदनगर वाहतूक), विजय झंझाड (श्रीगोंदा ते खर्डा), भानुदास गिते (नव्याने हजर ते नगर तालुका), प्रकाश पाटील (नव्याने हजर ते मिरजगाव), पप्पू कादरी (नव्याने हजर ते शिर्डी) व विजय माळी (नव्याने हजर ते कर्जत) अशा एकूण २५ सहायक निरीक्षकांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या गजेंद्र इंगळे (कोतवाली ते बीडीडीएस), अश्विनी मोरे (कोतवाली ते भरोसा सेल), यूवराज चव्हाण (नगर तालुका ते विशेष शाखा), योगेश चाहेर (एमआयडीसी ते अहमदनगर वाहतूक), श्रीकांत डांगे (पाथर्डी ते एटीएस), शैलेंद्र जावळे (पारनेर ते नियंत्रण कक्ष), अनिल भारती (जामखेड ते शिर्डी वाहतूक), पोपट कटारे (राहुरी ते नियंत्रण कक्ष),

मनोज महाजन (भिांगर ते कोपरगाव तालुका), तुळशीराम पवार (सुपा ते नियंत्रण कक्ष), अतुल बोरसे (श्रीरामपूर तालुका ते भिंगार), भरत दाते (कोपरगाव शहर ते पारनेर), समाधान भाटेवाल (कोपरगाव तालुका ते गुन्हे शाखा), संतोष पगारे (शिर्डी ते जामखेड) व मनोज मोंढे (नेवासा ते एमआयडीसी) अशा १८ पोलीस उपनिरीक्षकांसह एकूण ४३ दुय्यम पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच पोलीस निरीक्षक अशोक भवड यांची शनिशिंगणापूर येथे करण्यात आलेली बदलीही रद्द करण्यात आली आहे.

Visits: 141 Today: 1 Total: 1115723

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *