संगमनेर तालुक्यात बाबराचा आणखी एक वंशज सापडला! श्रीराम प्राणप्रतिष्ठापना बोचली; ‘सिर धड से अलग’ करण्याची इन्स्टाग्रामवर धमकी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी स्थापित झालेल्या बालकराम मूर्तीच्या दर्शनाने अवघे जग रामरसात चिंब झालेले असताना काही असंतुष्ट आत्म्यांकडून त्यात खोडा घालण्याचे उद्योगही सुरु आहेत. असाच संतापजनक प्रकार संगमनेर तालुक्यातूनही समोर आला असून तालुक्यात पुन्हा सापडलेल्या मंगोलीयन बाबराच्या एका वंशजाने इन्स्टाग्रामवरुन ‘सब्र, जब वक्त आएगा, तब सिर धड से अलग किए जायेंगे..’ अशाप्रकारचा मजकूर प्रसारित करीत समाज माध्यमात आपली जळजळ ओकली. याबाबत अमित कुलकर्णी या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन बोट्याच्या अब्दुल गफूर पठाण याच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यातून संताप व्यक्त केला जात असून इतक्या भक्तीमय वातावरणात श्रीराम प्रतिष्ठापना झालेली असताना त्यात विरजन टाकून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.२३) दुपारी साडेतीनच्या सुमारास समोर आला. बोटा येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमित कुलकर्णी याला त्याच्या इन्स्टाग्राम या समाज माध्यमातील एका प्लॅटफॉर्मवर त्याच्याच गावातील अब्दुल गफूर पठाण याने वादग्रस्त ढाचा म्हणून ओळखल्या गेलेल्या बाबरी मशिदीचा फोटो वापरुन त्यावर ‘सब्र, जब वक्त आएगा, तब सिर धड से अलग किए जायेंगे..’ अशाप्रकारचा एका समाजाच्या भावना भडकवणारा आणि दोन समाजातील सौहार्द धोक्यात आणणारा मजकूर प्रसारित केल्याचे दिसले.

हा प्रकार फक्त आपल्याशीच संलग्न आहे की इतरांनाही तो मिळालाय याची खात्री करण्यासाठी कुलकर्णीने गावातील इतरकाही तरुणांचेही मोबाईल तपासले असता त्यावरही अब्दुल पठाण याने प्रसारित केलेला ‘तो’ मजकूर आढळून आला. त्याची ही कृती गावासह तालुक्यातील सौहार्द आणि शांततेच्या वातावरणाला बाधा ठरण्याची शक्यता असल्याने संबंधित तरुणाने याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी बोट्यातील अब्दुल गफूर पठाण याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

सोमवारी (ता.२२) अयोध्येत नव्याने उभारलेल्या भव्य श्रीराम मंदिरात बालकराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासूनच देशभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर मंदिर आणि प्रभू श्रीराम यांच्या लोभस मूर्तीच्या चर्चा सुरु असतानाच बोट्यातील अब्दुल पठाणने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारचा मजकूर प्रसारित करुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आरोपीने स्वप्रेरणेतून हे दूष्कृत्य केले की त्यामागे षडयंत्र आहे याचा तपास लावण्याची गरज आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 118415

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *