जिल्ह्यात सव्वा लाख लोकांनी काढले ‘वन डे’ परमिट! नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ‘तळीराम’ झाले सज्ज


नायक वृत्तसेवा, नगर
अवघ्या काही दिवसांत हे वर्ष संपेल. आता नवीन वर्ष २०२४ सुरु होईल. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत म्हणजे तळीरामांसाठी सुवर्णदिवस असतो. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ३० हजार नागरिकांनी मद्य प्राशन करण्यासाठी तात्पुरत परवाना अर्थात वन डे परमिट घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी हे परवाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

‘वन डे परमिट’ साठी अहमदनगरमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले असून सध्या १ लाख ३० हजार लोकांना हे परवाने दिले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्ससह विविध लॉन्स सुसज्ज झाले असून नवीन वर्षानिमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकृत परवाने असणे आवश्यक आहे. जर परवाने नसतील तर मद्य सेवन व विक्री करता येणार नाही. यासाठी पथके विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. असे कुणी आढळले तर आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध विक्री रोखण्यासाठी ७ विशेष पथके तैनात असतील. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ख्रिसमस ते ३१ डिसेंबर या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांना दिलेल्या परवान्यांतून पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये विदेशी मद्य घेण्यासाठी ८० हजार तर देशी मद्यासाठी ५० हजार परवाने देण्यात आले आहेत.

Visits: 74 Today: 2 Total: 394333

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *