शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश चार पीडित मुलींची सुटका; एक महिला आरोपी ताब्यात


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथे द यूनिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असणार्‍या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली असून, एका महिला आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने गुरुवारी (ता.२१) ही कारवाई केली असून आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अवैध धंदे चालवणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की गुरुवारी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती मिळाली की शिर्डी येथील पिंपळवाडी रस्त्याच्या बाजूस द यूनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवला जात आहे. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून ४ पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, शिर्डीचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, बाबा खेडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा भारमल, पोलीस नाईक श्याम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे, सोमेश गरदास, चालक अप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

Visits: 183 Today: 2 Total: 1107823

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *