मिर्झापूर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

मिर्झापूर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील वर्षीच्या यशस्वी निकालानंतर यावर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळविले आहे.


यामध्ये यश रामदास वलवे 216 गुण, सिद्धांत संपत वलवे 210 गुण, कृष्णा अंबादास वलवे 188 गुण, काजल रावसाहेब घोडे 176 गुण, स्वामी प्रफुल्ल घोडे 168 गुण, शिवानी जालिंदर वलवे 130 गुण मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक भाऊसाहेब शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. या उज्ज्वल यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्ताराधिकारी चारुलता भोसले, केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी, श्री.ढगे, मुख्याध्यापक श्री.हासे, श्रीम.धुमाळ, श्री.चव्हाण व श्रीम.घुले आदी शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 168 Today: 1 Total: 2056557

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *