सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या दोघांना अटक; श्रीरामपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
घरफोडी, जबरी चोरी, जनावरे, सोयाबीन चोरी, खुनाचा प्रयत्न व गुंडगिरी करणारा माळवाडगाव येथील आरोपी मोटारसायकल रस्त्यात सोडून गावाच्याबाहेर उसाच्या शेतात पळत असताना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून पकडला.

मंगळवारी (ता.14) दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त बातमी मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील वारंवार चोरीचे गुन्हे करणारा आरोपी वेशांतर करून फिरत आहे. त्यानुसार पोलीस पथक तयार करून माळवाडगाव गावात सापळा लावला.
दरम्यान सुजित अनिल आसने (रा. माळवाडगाव) हा त्याच्या मोटारसायकलवर येताना दिसला. त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो मोटारसायकल रस्त्यात सोडून गावाच्या बाहेर उसाच्या शेतात पळत असताना पथकातील अधिकारी व अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याकडून मोटारसायकलसह ताब्यात घेऊन अटक केली तर दुसरा आरोपी तेजस उमेश मोरे यासही अटक केली.

सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ बडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र लंबाडे, पोलीस नाईक अशोक पवार, आबासाहेब गोरे, प्रशांत रणनवरे, अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कराळे, संदीप पवार, चाँदभाई पठाण यांनी केली आहे. या दोन्ही आरोपींविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे, वैजापूर तालुका वीरगाव पोलीस ठाण्यात 497, 379, 457, 380, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हे दाखल आहेत.

Visits: 146 Today: 1 Total: 1111519

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *