नागपूरला भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नरेंद्र पवारांचे आवाहन
नायक वृत्तसेवा, अकोले
भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे 22 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तरी सर्वांनी अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
अकोले येथे भाजप कार्यालयास माजी आमदार पवार यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, सहकार मंत्री अतुल सावे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, विश्वास पाठक, अतुल वझे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
भाजप भटके विमुक्त सेलचे युवक जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी सांगितले, या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी. तसेच भारतीय जनता पक्षाचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे नगर जिल्ह्यातून युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे व भटक्या विमुक्त सेलचे युवक जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते सत्कार माजी आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला. कल्याण जिल्हा उपाध्यक्ष तान्हाजी करपे, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव सुधाकर देशमुख, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, एनटी सेल युवक तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख सौरभ देशमुख, नवनाथ मोहिते, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.