संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरकारभार? संगमनेर भाजपचा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरकारभार झाल्याचे आढळून आले आहे. तसे कागदपत्रांचे पुरावे पंचायत समिती गटविकास अधिकार्यांना पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला आहे. तरी सुद्धा पंचायत समिती कार्यालयातून ग्रामसेवक व सरपंच, सदस्य यांची पाठराखण होत आहे असा दावा करत भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुकाध्यक्ष सतीष कानवडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरकारभार झाला आहे. खोटे ठराव तयार करून पदाचा गैरवापर केला आहे अशा अनेक तक्रारी करुन देखील पंचायत समिती कार्यालयाने दखल घेतली गेली नाही. यामुळे अनेक गावांतील जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. या निवेदनाची दखल घेऊन चौकशी सुरू करावी व संबंधित दोषींवर सात दिवसांत कडक कारवाई करावी. अन्यथा त्या-त्या गावातील ग्रामस्थांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असे निवेदनात म्हटले आहे. यावर उत्तर देताना गटविकास अधिकारी नागणे यांनी सदर तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

भारतीय जनता पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, बाळासाहेब कोंडाजी खेमनर, बुवाजी खेमनर, विकास गुळवे, माधव थोरात, बाबासाहेब कुटे, अमित नवले, हरिश्चंद्र चकोर, शिवाजी आहेर, लहानू नवले, दीपक वाळे, गणेश पावसे, विनायक दाभोलकर, श्रीकांत गोमासे, सोमनाथ कांडेकर, प्रकाश वर्पे, रुपेश जोंधळे, गुलाब कडलग, ठमा खेमनर, वसंत झिटे, आंनदा खेमनर, जानकू झिटे, सुभाष बर्डे, गजानन खाडे, डॉ. अरुण इथापे, कोंडाजी कडनर, विष्णू लोंढे, गंगा नवले, दत्तू नवले, समीर वाळे, भाऊसाहेब वाकचौरे, रोहिदास साबळे, रामा खेमनर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.
