आनंदराव कढणेंचे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान ः थोरात आनंदराव कढणेंचा सहस्त्र चंद्रदर्शन व अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या तालुक्यातील चंदनापुरी येथील तरुण कायमच विविध क्षेत्रात आपलं नैपुण्य दाखवत आहे. आनंदराव कढणे यांच्या रूपाने कृषी खात्याला चांगला अधिकारी लाभला. यावर न थांबता त्यांनी पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कढणे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा कढणे यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा आणि अभीष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लहानू गुंजाळ, डॉक्टर जयश्री थोरात, अ‍ॅड. माधव कानवडे, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, विवेक कासार, सुभाष आहेर, रामदास रहाणे, दिलीप शिंदे, बाबुराव गवांदे, दिलीप शिंदे, मुरलीधर हासे, चांगदेव खेमनर, रवींद्र ढेरंगे, नानासाहेब खर्डे, राजेंद्र नाकिल, अनिल कढणे, अशोक रहाणे, नरेंद्र रहाणे, शांताराम कढणे, आर. बी. रहाणे, विलास कढणे, प्रवीण कढणे, शशीकांत कढणे, जयराम कढणे, शुभम कढणे, अभिषेक कढणे, संदीप कढणे, सागर कढणे, सुनील कढणे, विजय रहाणे आदी मान्यवर व नातेवाईक यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी कढणे परिवाराच्यावतीने उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदराव कढणे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा कढणे यांचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री आमदार थोरात यांच्यासह सर्वच मान्यवरांनी आनंदराव कढणे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत गौरव केला. तसेच जनता शिक्षण प्रसारक मंडळातील आनंदराव कढणे यांचे मोलाचं योगदान राहिलं आहे. याबद्दलही माजी प्राचार्य एम. एम. फटांगरे यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले. तसेच त्यांची नात ऐश्वर्या आणि नातू यांनीही आपल्या आजोबांविषयी आपलं मनोगत व्यक्त केले. तर दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, लहानू गुंजाळ, कॉम्रेड कारभारी उगले यांनीही आनंदराव कढणे यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय माजी मंत्री अण्णासाहेब शिंदे आणि स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतूनच आपल्याला शिक्षण आणि शेती व्यवसायात काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सत्काराला उत्तर देताना आनंदराव कढणे यांनी सांगितले. अध्यक्षीय सूचना कैलास सरोदे यांनी मांडली, त्यास विजय रहाणे यांनी अनुमोदन दिले. सूत्रसंचालन राजेंद्र डुबे यांनी व योगेश साळुंके यांनी केले. शेवटी विलास कढणे यांनी मानले.

Visits: 131 Today: 1 Total: 1105731

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *