शिक्षकांच्या अंतप्रेरणेतून समाज परिवर्तन शक्य होईल ः कुलकर्णी

शिक्षकांच्या अंतप्रेरणेतून समाज परिवर्तन शक्य होईल ः कुलकर्णी
देशमुख मळा शाळेत डिजिटल क्लासरूम व वाचनालयाचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळांना समाज नक्कीच मदत करतो. परंतु ती मदत उपक्रमशील शिक्षक ज्या प्रेरणेने काम करतात ते बघूनच करतो. त्यामुळे देशमुख मळा शाळेला लोकसहभागातून सतत मिळणारी मदत ही शिक्षकांच्या अंतप्रेरणेतून केलेल्या कामाला मिळणारी दाद आहे. अशा शिक्षकांच्या अंतप्रेरणेतून समाज परिवर्तन शक्य होईल, असे प्रतिपादन प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केले.


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख मळा येथे संगमनेर रोटरी क्लब तर्फे रोटरी ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम प्रकल्प आणि रोटरी बाल वाचनालय व कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते वसंत देशमुख व रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांचे हस्ते बुधवारी (ता.30) सकाळी 10 वाजता पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर योगेश देशमुख, रोटरी सचिव योगेश गाडे, सुनील कडलग, मधुसूदन करवा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख, प्रा.शरद तुपविहिरे, उपसरपंच पूजा तोरकडी, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, वृषाली कडलग उपस्थित होते. कै.भाऊराव (दगुनाना) तुकाराम देशमुख स्मृतीप्रित्यर्थ वसंत देशमुख व बंधू परिवाराकडून आणि कै.प्रभाकर चिमणाजी देशमुख स्मृतीप्रित्यर्थ माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख यांचेकडून रोटरी क्लबच्या मदतीने रोटरी ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम प्रकल्प, रोटरीच्या देणगीतून रोटरी बाल वाचनालय प्रकल्प व कोविडच्या पार्श्वभूमीवर हॅन्ड सॅनिटायझर प्रकल्प उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांच्या प्रयत्नांतून राबविण्यात आला. याप्रसंगी श्रीकांत माघाडे, अशोक देशमुख, विठ्ठल डेरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू नागरे यांनी तर आभार रवींद्र कवडे यांनी मानले.

Visits: 70 Today: 1 Total: 1107238

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *