आरोग्य सुधारण्यासाठी वालझाडे दाम्पत्याचे कार्य मोठे ः पिचड राजूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर

नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी भागातील आरोग्य, कुपोषण थांबविण्यासाठी सरकारी यंत्रणांसोबत सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता असून संगमनेर येथील अमोल वालझाडे दाम्पत्य पुढे येऊन स्वामी समर्थ संस्थेसोबत अकोले तालुक्याचे आरोग्य सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले.

अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी हेमलता पिचड, योगी केशवबाबा चौधरी, डॉ. अमोल वालझाडे, डॉ. कल्पिता वालझाडे, डॉ. प्रशांत याकुंडी, डॉ. अनंत नेरळकर, डॉ. अनिल कोरडे, संतोष बनसोडे, गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे आदी उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, विश्वकुसुम फाउंडेशन संगमनेर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक संगमनेर, साईदृष्टी नेत्रालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सर्व रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रांगणात हे पार पाडले. अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभही झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे. वडिलांच्या संस्काराचा ठेवा, लोककल्याणाचा वसा संस्था चालकांनी घेतला असल्याचेही माजी आमदार पिचड म्हणाले. सुरेश खांडगे यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. योगी केशवबाबा चौधरी यांनी संस्थेच्या जडणघडणीचे किस्से सांगितले. अध्यक्षीय भाषणात हेमलता पिचड यांनी शाळेची प्रगती पाहून आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी ईसीजी, ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, बीएमआय, एसपीओ टू, नेत्र तपासणी करून आरोग्य शिबिर संपन्न केले. यास मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी उपसभापती दत्ता देशमुख, श्रीनिवास येलमामे, शरद मुळे, पांडुरंग भांगरे, प्रा. देशमुख, सुभाष चासकर, राम पन्हाळे, काशिनाथ साबळे, श्रीनिवास वाणी, शेखर वालझाडे, आर. टी. देशमुख, गंगाराम धिंदळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले. परिचय विनायक साळवे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले तर आभार विलास महाले यांनी मानले.
