डॉ. पगडाल ऑर्थो क्लिनिकचे दुसर्या वर्षात पदार्पण अल्पकालावधीमध्येच प्रामाणिक रुग्णसेवेने मिळविला लौकीक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कुठल्याही प्रकारची सांध्याची शस्त्रक्रिया करायचे म्हटले की पहिले संगमनेरकरांना नाशिक किंवा पुणे या मोठ्या शहरांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसायचा. ज्यामध्ये रुग्णाचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जायचा. रुग्णांच्या या धावपळीचा आणि त्रासाचा विचार करून डॉ. सौरभ पगडाल यांनी 5 ऑगस्ट 2021 रोजी डॉ. पगडाल ऑर्थो क्लिनिकची सुरुवात केली. संगमनेरकरांसाठी अतिशय अल्पकालावधीमध्येच आपल्या प्रामाणिक रुग्णसेवेने डॉ. पगडाल यांनी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. डॉ. पगडाल यांनी विविध जटील शस्त्रक्रियांद्वारे एक वर्षाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून आज ते दुसर्या वर्षात पदार्पण करत आहे.

डॉ. सौरभ पगडाल यांनी बारावीनंतर मेडिकल सीईटीमधे तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. हॉस्पिटल येथे झाले आहे. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीच्या सीईटी परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून केंद्र सरकारच्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनद्वारे डीएनबी ऑर्थो हा डिग्री कोर्स प्रथम श्रेणीत पूर्ण केला. डॉ. पगडाल यांनी पुण्यातील ससून हॉस्पिटल येथे दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया व सांधेरोपण शस्त्रक्रियांचे विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. पद्मश्री विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे अनेक अवघड व जटील फ्रॅक्चर शस्त्रक्रिया व दुर्बीणद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

डॉ. पगडाल यांनी आत्तापर्यंत 300 हून अधिक खुबा सांधेरोपण (हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया, गुडघे व इतर सांध्यांच्या लिगामेंट टियरच्या (फाटलेल्या दोरी) दुर्बीणांद्वारे अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत. त्यापैकी खुबा सांधेरोपणाच्या आत्तापर्यंत 100 शस्त्रक्रिया केल्या असून 200 शस्त्रक्रिया या दुर्बीणीद्वारे केलेल्या आहेत. विशेष म्हणजे अतिशय दुर्मिळ अशा गुडघ्याच्या वाटीच्या दोरीच्या जखमेवर त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये शस्त्रक्रिया केली होती, त्याचा शोधनिबंध पमबेडच्या अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. सौरभ पगडाल हे पगडाल ऑर्थो क्लिनिक व्यतिरिक्त कुटे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपली रुग्णसेवा देत असतात. नुकतीच त्यांनी कुटे हॉस्पिटलमध्ये खांद्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली ज्याचे संगमनेरकरांनी अतिशय भरभरून कौतुक केले. डॉ. पगडाल हे आपल्या यशस्वी वाटचालीमागे असणारे श्रेय हे आपले रुग्ण, आई-वडील आणि पत्नी यांना देत असतात आणि भविष्यातही चांगल्यात चांगल्या रुग्णसेवा किंवा अत्याधुनिक सुविधा देण्याचा त्यांचा मानस आहे.
