पद्मावतीमध्ये ‘स्प्लेंडर प्लस एक्सटेक’चे अनावरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिरो मोटोक्रॉपची सर्वाधिक विकली जाणारी ‘स्प्लेंडर प्लस एक्सटेक’ ही दुचाकी आता आकर्षक वैशिष्ट्यांसह संगमनेरातील पद्मावती दालनामध्ये दाखल झाली आहे. बुधवारी (ता.15) मान्यवरांच्या हस्ते या नवीन दुचाकीचं अनावरण करण्यात आलं आहे.
भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ही दुचाकी आता घरातील सर्वांच्या आवडीची गाडी म्हणून ओळख पावत आहे. आजही भारतात सर्वाधिक जास्त विकली जाणारी ही गाडी ग्राहकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास यानिमित्ताने व्यवस्थापक अक्षय देवकर यांनी व्यक्त केला आहे. या गाडीमध्ये सर्वांच्या सोयीनुसार आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम मायलेज, संपूर्ण डिजिटल मीटर कंसोल, हाय इन्टेनसिटी पोझिशन, डिजिटल स्पीड डिस्प्ले, डिजिटल वोडो डिस्प्ले सर्विस रिमाइंडर, साईड स्टँड इंजिन कट ऑफ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ज्यामध्ये कॉल अलर्ट एसएमएस अलर्ट मोबाईल बॅटरी डिस्प्ले आदी वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा संगम आहे. तसेच हिरोच्या सर्व गाड्यांसाठी सुलभ फायनान्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त आधारकार्ड दाखवून आपल्याला नवीकोरी गाडी घरी नेता येणार आहे अशी माहिती पद्मावतीचे संचालक सुमित मणियार यांनी दिली आहे. याशिवाय ‘स्प्लेंडर प्लस’ या गाडीला उत्कृष्ट मायलेज कमी मेंटेनन्स जास्तीत जास्त फेरविक्री किंमत मिळत असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत आहे हे लक्षात घेऊन हिरो मोटोकॉर्पने सर्वांच्या लाडक्या स्प्लेंडर प्लसचे नवीन रूप स्प्लेंडर प्लस एक्सटेक ही बाजारात आणली आहे. पद्मावती हिरोमध्ये नवीन स्प्लेंडर एक्सटेक सर्व रंगांमध्ये उपलब्ध आहे. तरी अधिक माहितीसाठी सुमित मणियार यांच्याशी (9890893535) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.