नायगाव येथील गोदावरी पात्रात डंपरसह पोकलेन पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाळूतस्करांमध्ये उडाली खळबळ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून वाळू चोरी करणारा डंपर व पोकलेन पकडला. यामुळे वाळूतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नायगाव येथून नदीपात्रातून पोकलेन व डंपरमधून बेकायदेशीर वाळू चोरून नेली जात असल्याची गुप्त खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे 1 पोकलेन व टाटा कंपनीचा हायवा डंपर वाळू चोरताना मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी ह्युंदाई कंपनीचा पोकलेन (क्र. आर.210/7 सिरीयल क्र. एन.601 डी 04570) तसेच टाटा कंपनीचा हायवा डंपर ट्रक (क्र. एमएच.20, 8911) पोलिसांनी ताब्यात घेतला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हायवा चालक अमोल बाबासाहेब कराळे (वय 31, रा. रोठीवस्ती, ता. वैजापूर) व पोकलेन चालक अनुपकुमार मिश्रीप्रसाद (वय 24, रा. महाई बलिया, चितबडागाव, उत्तरप्रदेश) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 379, 511, 34, पर्यावरण कायदा कलम 3/15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, चंद्रकांत कुसळकर, पोलीस नाईक शंकर चौधरी, सचिन अडबल, संदीप दरंदले, राहुल चोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.

Visits: 5 Today: 3 Total: 30445

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *