‘ड्राय डे’च्या दिवशी अकोले पोलिसांनी दारु पकडली 56 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर तिघांना अटक

नायक वृत्तसेवा, अकोले
‘ड्राय डे’च्या दिवशी देशी दारुची अवैध साठवणूक व विक्री करताना अकोले पोलिसांच्या पथकाने तिघांना जेरबंद केले आहे. तसेच या कारवाईत पोलिसांनी 56 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त परवानाधारक मद्य दुकांनासाठी ड्राय डे असल्याने अकोले शहरात व परिसरात अवैधरित्या दारुची विक्री होणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस पथक तयार करुन शहरातील शाहूनगर, सुभाष रोड, अगस्ति कारखाना रोड, आंबेडकर नगर याठिकाणी अवैध दारुची साठवणूक व विक्री करणार्या ठिकांणावर छापे टाकले. यावेळी 56 हजार 760 रुपंयाची देशी दारु जप्त केली आहे.

या प्रकरणी अकोले पोलिसांनी धनेश्वर काशिनाथ पवार (रा. आंबेडकर नगर, अकोले), विलास शंकर पवार (रा. सुभाष रोड, अकोले), सतीष विलास पवार (रा. सुभाष रोड, अकोले), उषा शेटीबा पवार (रा. शाहूनगर, अकोले) व माधुरी गायकवाड (रा. कारखाना रोड, अकोले) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पोहेकॉ. महेश आहेर, पोना. विठ्ठल शेरमाळे, मपोना. संगीता आहेर, पोकॉ. अविनाश गोडगे, सुयोग भारती, कुलदीप पर्बत, विजय आगलावे, सुहास गोरे, मपोकॉ. मनीषा पारधी यांनी ही कारवाई केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोहेकॉ. महेश आहेर हे करीत आहे.
