सरपंच बाळासाहेब ढोलेंच्या वाढदिवसाने अनेकांच्या भुवया उंचावल्या! आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे व आ.डॉ.किरण लहामटेंची उपस्थिती
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावचे आदर्श सरपंच बाळासाहेब ढोले यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यांच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीने यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहावयास मिळाले. या कार्यक्रमास आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे यांची उपस्थिती होती.
आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांचा शनिवारी (ता.29) संध्याकाळी शिवगर्जना प्रतिष्ठान आणि मा.श्री.बाळासाहेब ढोले मित्रपरिवाराने लक्ष्मी मंगल कार्यालयात अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे यांचे व्याख्यान व रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. तांबे, सत्यजीत तांबे, आमदार डॉ. लहामटे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, चंद्रकांत घुले, युवानेते गणेश लेंडे यांनी सरपंच बाळासाहेब ढोले यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा गौरव केला. लक्ष्मी उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब गाडेकर, आंबीदुमाला गावचे आदर्श सरपंच जालिंदर गागरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश आहेर, आनंदा गाडेकर, आंबी-माळेगाव सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ कहाणे, माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महादेव वाणी, तुळशीनाथ भोर, सर्जेराव ढमढेरे, शांताराम वाकळे, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, जयहिंद युवा मंच पठारभाग अध्यक्ष सुहास वाळुंज, पठारभाग युवक काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब कुर्हाडे, भाग्यश्री नरवडे, जयराम ढेरंगे, सोपान भोर, दत्तात्रय कान्होरे, सुरेश गाडेकर, संतोष घाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या खांद्याला खांदा लावून स्वर्गीय प्रभाकरराव भोर, निवृत्ती ढोले यांनी काम केले आहे. त्यांचाच वारसा पुढे पठारभागातील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ढोले यांनी चालवला आहे. मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असल्याने ते सर्वांना बरोबर घेवून काम करत आहे. त्याचबरोबर सामान्य माणसांची सेवा करण्यासाठी राजकारण असते. अशय कर्तबगार असे बाळासाहेब ढोले यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कामाचा आवाज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमच्यापर्यंत पोहोचत असतो. आमदार डॉ. लहामटे म्हणाले, आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांचे संघटन कौशल्य खूप चांगले आहे. आंबीखालसा गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर या भागातील शेतकर्यांना विजेच्या संदर्भात अडीअडचणी येणार नाही त्याबाबतही संबंधित अधिकार्यांशी बैठक घेणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, सर्व समाजातील लोक तुमच्या वाढदिवसानिमित्ताने याठिकाणी आले यातूनच तुमचे कर्तृत्व दिसून येते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांच्या खांद्याला खांदा लावून प्रभाकरराव भोर यांनी काम केले असून निवृत्ती ढोले यांनीही या भागात मोठे काम केले आहे. आज जिल्हा परिषद सदस्यांची खूप वाईट अवस्था आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीतही अजय फटांगरे यांनी बोटात विकास कामे केली आहे हे त्यांचे कौशल्य आहे.
जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले, बाळासाहेब ढोले हे अतिशय सयंमी, शांत असे नेतृत्व आहे. सरपंच म्हणून ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्याचबरोबर मुळा बारमाही करण्यासाठी निवृत्ती ढोले यांचे मोठे योगदान राहिले आहे. ढोले परिवाराने हा वारसा पुढे नेला असून आज हॉटेल व्यवसायात त्यांचे मोठे काम आहे. शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर म्हणाले, स्वर्गीय निवृत्ती ढोले यांनी आम्हांला खर्या अर्थाने राजकारणाची दिशा दिली. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या खांद्याला खांदा लावून निवृत्ती ढोले यांनी पठारभागात काम केले. त्यात मुळा बारमाही होण्यासाठी सातत्याने ढोले यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच मुळा बारमाही झाली आहे. निवृत्ती ढोले यांच्याकडे प्रामाणिकपणा व नैतिकता असल्याने आज ढोले कुटुंब हे प्रगतीपथावर आहे. सत्काराला उत्तर देताना सरपंच बाळासाहेब ढोले म्हणाले, माझे वडील स्वर्गीय निवृत्ती ढोले यांनी समाजासाठी जे काम केले ते मला करायचे आहे. गरीबीचे चटके काय असतात ते खर्या अर्थाने आमच्या वडीलांनी आम्हाला दाखवून दिले आहे. पठारभागाच्या विकासात वडीलांचा मोठा वाटा राहिला आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी वडिलांची होती. मला राजकारण नाही तर समाजकारण करायचे आहे. जेव्हापासून सरपंच झालो तेव्हापासून प्रथम शाळेवर भर दिला आहे. तसेच महिला बचतगटांचे जाळेही मोठे निर्माण झाले आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. कांद्याच्या लागवडी शेतकर्यांनी केल्या आहे. मात्र लोडशेडिंगमुळे आज शेतकर्यांचे हाल होत आहे.
आदर्श माजी सरपंच भास्कर पेरे म्हणाले की, बिनविरोध सरपंच होणे आजच्या काळात येवढे सोपे नाही. मात्र खर्या अर्थाने आईवडीलांची पुण्याई असल्याने तुम्ही सरपंच झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य चुकून होवू नका आता काही उपयोग नाही. कारण ग्रामपंचायतीचे सरपंच होवून जे करता येते ते सदस्य म्हणून करता येणार नाही. माझे शिक्षण नाही मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, तरीही आज काम करत आहे आपल्या नशिबाला आलेले काम करा तेथेच देव भेटतो. अनेक वृध्दांना आमची ग्रामपंचायत सांभाळते. गावोगावचे सरपंच वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येवू लागले म्हणजे आज देश बदलत आहे. त्याचबरोबर चांगले आरोग्य जगण्यासाठी चांगला आहार असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीचा टॅक्स भरा, त्यामुळे गावचा विकास होईल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवगर्जना प्रतिष्ठान व बाळासाहेब ढोले मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.