जनता बंदमध्येही अकोलेत दारू विक्री सुरू ः कुलकर्णी

जनता बंदमध्येही अकोलेत दारू विक्री सुरू ः कुलकर्णी
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोले शहरातील व्यापार्‍यांनी एकत्र येत जनता बंद पाळला आहे. छोटे दुकानदार, हॉटेल मालक हे पोटाला चिमटा देऊन स्वतःची आर्थिक नुकसान करून घेत केवळ गावाच्या हितासाठी यात सहभागी झाले आहेत. परंतु, अशा एकजुटीच्या काळात शहरातील दारू विक्रेते खुलेआमपणे विक्री करत आहे. त्यामुळे व्यापारी असोसिएशनचे आवाहन देशी दारू विक्रेत्यांना लागू नाही का? असा उद्विग्न सवाल सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी केला आहे.


अकोले शहरातील महात्मा फुले चौक ते नदी अंतरात असलेल्या देशी दारूच्या दुकानात जनता टाळेबंदीच्या काळात खुलेआम दारू विकली जात आहे. या व्यसनामुळे त्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी होऊन ते रोगाला बळी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये छोटे हॉटेलचालक स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत असतानाही देशी दारू विक्रेते धंदा चालू ठेवून गावाच्या एकजुटीला तडा देत आहेत. याची प्रशासनाने व व्यापारी असोसिएशनने गंभीर दखल घ्यावी, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे.

Visits: 86 Today: 1 Total: 1116237

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *