घुलेवाडीच्या सरपंचपदी दत्तात्रय राऊत बिनविरोध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असणार्‍या घुलेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सत्ताधारी काँग्रेस गटाचे दत्तात्रय राऊत यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.

घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या अकार्यक्षम कारभारास कंटाळून घुलेवाडी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव मान्यतेसाठी ग्रामसभेपुढे मांडण्यात आला. त्यानंतर त्यावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांना आपल्या सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर सरपंचपदी दत्तात्रय राऊत यांची सर्व सदस्यांच्या एकमताने निवड करण्यात आली. यासाठी उपसरपंच चंद्रकांत पानसरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत क्षीरसागर, भाऊसाहेब पानसरे, भाऊसाहेब सातपुते, दिलीप पराड, हरी ढमाले, मच्छिंद्र राऊत, महिला सदस्या सुवर्णा वाकचौरे, जिजाबाई सातपुते, सरीता खरात, निकिता मालुंजकर, जयश्री दुशिंग, मंगल राऊत, सविता आसणे, पुंजाबाई पावबाके, परिगाबाई दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, माजी सरपंच भास्कर पानसरे, अजित पानसरे, राजू खरात, नामदेव गायकवाड, रोहिदास बर्गे, रवींद्र गिरी, राहुल वर्पे, चंद्रकांत वाकचौरे, पप्पू मालुंजकर, बाळासाहेब पानसरे, भाउसाहेब पानसरे, मनोज तामचीकर, विजय गुंजाळ, पंकज वाघमारे, नितीन साळुंखे, संतोष राऊत, अनिल राऊत, सनी अभंग, विजय कांबळे, शिवाजी शिंदे, किशोर साळवे, संतोष पुरी, सुनील राऊत, अनिल राऊत, नीलेश सातपुते, मंगेश सातपुते, सतीश भेंडाळे, महेश पावबाके, नीलेश गायकवाड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी बाळासाहेब नांदूरकर यांनी काम पाहिले. तर त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी सुभाष कुटे यांनी व कामगार कामगार तलाठी भीमराज काकड यांनी मदत केली. या निवडीबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे आदिंनी अभिनंदन केले.

Visits: 14 Today: 1 Total: 118885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *