‘विजया अ‍ॅग्रो’मधून मोबाइलसह दहा हजार रुपये लांबविले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराजवळ असणार्‍या औद्योगिक वसाहतीतील विजया अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या दरवाजाचे शुक्रवारी (ता.1) मध्यरात्रीच्या सुमारास लॉक तोडून दहा हजार रुपये रोख आणि चार मोबाइल संच दोघा चोरट्यांनी लांबविले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, कंपनीने शहर पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.

पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील विजया अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज व्यवस्थापन नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी कार्यालय बंद करुन निघून गेले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे अज्ञात दोघा चोरट्यांनी लॉक तोडू ड्रॉवरमधील दहा रुपयांची रक्कम आणि चार मोबाइल संच चोरुन पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर उद्योजक सुहास आभाळे यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांच्या दुचाकीला मोबाइल कॅमेर्‍यात टिपले आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने संगमनेर शहर पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार पोलीस पुढील कार्यवाही करत आहे.

Visits: 78 Today: 2 Total: 1098433

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *