अक्षय ढोकरेसह तरुणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील अक्षय ढोकरे याच्यासह अनेक तरुणांनी नुकताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

संगमनेरचे लोकप्रतिनिधी तथा विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुका विविध क्षेत्रांनी समृद्ध केलेला आहे. सहकार, कृषी, औद्योगिक, बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध घटकांत रोजगाराच्या संधी निर्माण करुन दिल्या आहेत. तसेच सातत्याने तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. यामुळे पठारभागातील कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील अक्षय ढोकरे, राजेंद्र भागवत, शुभम खांडगे, सागर ढोकरे, गौरव शेजूळ, श्रीकांत कोठवळ, ओम खराटे, तुषार फटांगरे, अतुल घुले, ओंकार खराटे, अजित खांडगे, तेजस ढोकरे, शुभम जठार, अन्वर तांबोळी, अमोल फटांगरे, शुभम कोठवळ आदिंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसची विचारधारा आणि शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल मंत्री थोरात व बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे अक्षय ढोकरे याने सांगितले.
