वडाळा बहिरोबा येथे घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरला

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील वडाळा बहिरोेबा येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही, एक तोळा सोन्याचे दागिने, दुचाकी आदी वस्तू चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत गणेश तुकाराम बडगू यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, पत्नी आजारी असल्याने अहमदनगरला उपचारासाठी अ‍ॅडमिट होती. मुलगा अथर्व (वय 15) हा घराला कुलूप लावून अहमदनगरला त्याच्या आईकडे हॉस्पिटलला गेलेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी शेजारी राहणारे राजेंद्र झावरे यांनी फोनवरून सांगितले की, तुमचे घर उघडे दिसत आहे. मी व मुलगा घरी आलो असता दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले दिसले. घरात जाऊून पाहिले असता वनप्लस कंपनीचा एलईडी टीव्ही अंदाजे किंमत 12 हजार रुपये, कपाटात ठेवलेले 8 ग्रॅमचे सोन्याचे मनीमंगळसूत्र, अडीच ग्रॅमची कर्णफुले, चांदीच्या तीन छोट्या लक्ष्मीच्या मूर्ती, चांदीचा ग्लास व चमचा, इंटेक्स कंपनीचे होमथिएटर व दुचाकी (एमएच. 17, एके.2049) चोरीस गेल्याचे दिसून आले. यावरून शनिशिंगणापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं. 98/2021 भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 189 Today: 1 Total: 2125124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *