संगमनेर तालुक्याच्या पठारभागात कोविडचा पुन्हा उद्रेक! शहरासह तालुक्यातील नऊ गावांतून शंभरावर रुग्ण; चोवीस तासांत तिघांचा मृत्यू..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवी चुकांमूळे वारंवार संक्रमणाचे धक्क सोसणार्‍या संगमनेर तालुक्यात कोविडचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून आज गेल्या 22 दिवसांतील उच्चांकी रुग्ण समोर आले आहेत. जंगी विवाह सोहळ्यातून संक्रमणाचा मोठा फटका बसलेल्या पठारभागात पुन्हा रुग्णांची संख्या वाढली असून पठारावरील चोवीस गावांमधून आज तब्बल 85 रुग्ण आढळले आहेत. आज शहरासह पठारावरील मांडवे, साकूर, शिंदोडी, बिरेवाडी, तळेगाव दिघे, सायखिंडी, घुलेवाडी व शेडगावमधून शंभरावर रुग्ण समोर आले आहेत. गेल्या चोवीस तासांत तालुक्यातील तिघांचा कोविडने बळीही घेतला असून एकूण मृत्युची संख्या आता 417 तर एकूण रुग्णसंख्या 26 हजार 953 झाली आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांचा आकडाही आता हजाराच्या पल्याड गेल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.


कोविड संक्रमणाच्या अनुषंगाने ज्या जिल्ह्यांचा रुग्ण समोर येण्याचा सरासरी वेग दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि ज्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन खाटांवर 25 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण दाखल आहेत अशा जिल्ह्यांना कोविडच्या निर्बंधातून सुट देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. गेल्या आठवठ्यात संपूर्ण राज्यातील पॉझिटिव्ह दर व दाखल रुग्णांची संख्या ठरलेल्या निकषांच्याही खाली आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून दुपारी चार वाजेपर्यंतची मर्यादा हटवून ती रात्री 10 वाजेपर्यंत केली, तर शनिवार व रविवारचा वीकएण्ड लॉकडाउनही रद्द केला. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली सुरु असल्याचे स्पष्ट आहे. संगमनेर तालुक्यात तसेच चित्र दिसत असून नागरिकांच्या हलगर्जीपणात आता प्रशासकीय यंत्रणेचाही हलगर्जीपणा मिसळल्याने सगकुछ अलबेल असल्याचा फुगा आता फुटू लागला असून निर्बंध शिथील झाल्यानंतर दोनच दिवसांत त्याचे दुष्परिणाम रुग्णसंख्येच्या माध्यमातून स्पष्टपणे समोर आले आहेत.


आज शासकीय प्रयोगशाळेचे बारा, खासगी प्रयोगशाळेचे 165 व रॅपीड अँटीजेनचे पन्नास अशा एकूण 227 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. आजच्या अहवालातून तालुक्यातील 64 गावे व वाड्यावस्त्यांना संक्रमणाची झळ बसली असून त्यात पठारावरील 24 गावांचा समावेश आहे. आज शहरातील रुग्णसंख्येतही मोठी भर पडली असून मोठ्या कालावधीनंतर तब्बल 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातील धक्कादायक बाब म्हणजे पठारावरील मांडवे व संगमनेर शहरातून प्रत्येकी 20, तळेगाव दिघे येथून 14, सायखिंडीतून दहा, घुलेवाडीतून नऊ, तर साकूर, शिंदोडी व बिरेवाडी येथून प्रत्येकी आठ आणि शेडगाव येथून सात जणांसह या गावांमधून तब्बल शंभर रुग्ण आढळले आहेत.


आज शहरातील इंदिरानगर येथील 53 वर्षीय इसम, चव्हाणपूरा येथील 55 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथील 45 वर्षीय इसम, हनुमान शरण वसाहतीमधील 35 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 65, 60, 54, 44 वर्षीय दोघी, 40, 30 व 25 वर्षीय महिला, 55 व 43 वर्षीय इसमांसह 37, 35, 25, 24 व 23 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. पठारभागातील मांडवे परिसरातून आज माठ्या संख्येने रुग्ण समोर आले असून त्यात 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57, 46 व 43 वर्षीय इसम, 40, 37, 33 व 18 वर्षीय तरुण, 69, 60, 38, 35, 32, 30 वर्षीय दोघी व 28 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय दोघे व 13 वर्षीय मुलगा, शिंदोडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 46 वर्षीय इसम, 35 वर्षीय तरुण, 31, 30 वर्षीय दोघी व 26 वर्षीय महिला आणि 12 वर्षीय मुलगा,


साकूर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38, 27 व 25 वर्षीय तरुण, 50, 35 व 30 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलगा, बिरेवाडीतील 41, 35 व 28 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुणी, 17 व 15 वर्षीय मुली, जांभुळवाडीतील 55, 42 व 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय इसम व 30 वर्षीय तरुण, रणखांब येथील 60 व 35 वर्षीय महिलांसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व बारा वर्षीय मुलगा, नांदूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 15 वर्षीय मुलगी व बारा वर्षीय मुलगा, हिरेवाडीतील 75 व 60 वर्षीय महिलांसह 18 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 35 वर्षीय महिलेसह 22 व 19 वर्षीय तरुण, जांबुत येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला व 55 वर्षीय इसम,


कोठे बु. येथील 50 वर्षीय इसम, कुंभारवाडीतील 32 वर्षीय महिला, अकलापूर येथील 43 वर्षीय इसम, कौठे मलकापूर येथील 25 व 18 वर्षीय तरुण, महालवाडी येथील 23 वर्षीय महिला, शेंडेवाडीतील 58 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, चिंचेवाडीतील 60 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, माळवाडी येथील 39 वर्षीय तरुण, बोटा येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 23 वर्षीय तरुण, हिवरगाव पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय इसम, आंबी खालसा येथील 60 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 50 वर्षीय महिला, खरशिंदे येथील 82 व 28 वर्षीय महिला आणि सावरगाव घुले येथील 55 वर्षीय महिलेचा आजच्या बाधित यादीत समावेश आहे.


याशिवाय तालुक्यातील अन्य चाळीस गावांमधून आज तब्बल 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात तळेगाव दिघे परिसरात कोविडची रुग्णसंख्या धक्कादायकरितीने वाढल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालातून तळेगाव दिघे येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 47 वर्षीय इसम, 40, 35, 33, 30, 22 व 20 वर्षीय तरुण, 45 व 39 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी व बारा वर्षांची दोन मुले, सायखिंडीतील 75, 60, 55, 30 व 25 वर्षीय महिला, 40, 39, 35 व 18 वर्षीय तरुण व 13 वर्षीय मुलगी, घुलेवाडीतील 67, 62, 60, 44 व 34 वर्षीय महिलांसह 50 वर्षीय इसम, 23, 20 व 18 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 40, 35 व 28 वर्षीय महिला, 33 व 22 वर्षीय तरुण, 16 व पाच वर्षीय मुले,


जोर्वे येथील 13 वर्षीय मुलगा, निमगाव बु. येथील 45 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 73 वर्षीय महिला, निमज येथील 70 वर्षीय महिला, मनोली येथील 48 वर्षीय इसम, 32 वर्षीय तरुण, 27 वर्षीय महिला व 17 वर्षीय मुलगी, उंबरी बाळापूर येथील 25 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण व 13 वर्षीय मुलगा, पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, प्रतापपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालुंजे येथील 14 वर्षीय मुलगी, खळी येथील 55 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी, ओझर खुर्द येथील 17 वर्षीय मुलगा, निमगाव पागा येथील 41 वर्षीय तरुणासह 38 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 41 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 30 वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगी, अंभोरे येथील 23 वर्षीय महिला,


चिंचपूर येथील 45 वर्षीय इसमासह 18 वर्षीय तरुण, 13 वर्षीय मुलगा व एक वर्षीय बालिका, चणेगाव येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 32 वर्षीय दोघे तरुण, पिंपरणे येथील 36 वर्षीय तरुण, चिकणी येथील 25 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 30 वर्षीय महिलेसह 10 वर्षीय मुलगी, धांदरफळ खुर्द येथील 36 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिखली येथील 32 वर्षीय महिला, 31 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगी, आश्‍वी येथील 46 व 45 वर्षीय इसमांसह 23 व 19 वर्षीय दोन तरुण, 26 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 27 वर्षीय महिला, पाच वर्षीय मुलगा, वेल्हाळे येथील 70, 48 व 33 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण,


मंगळापूर येथील 25 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालिका, कासारा दुमाला येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय तरुण, पोखरी हवेलीतील 33 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 84 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 38 वर्षीय तरुण व 34 वर्षीय महिला, राजापूर येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 41 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिला, चंदनापूरी येथील 51 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय इसम, 50 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय इसम, 42 व 23 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 71 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व धांदरफळ येथील 57, 53 व 52 वर्षीय इसम. तसेच अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील 25 वर्षीय महिला व श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथील 16 वर्षीय मुलीचाही बाधितांमध्ये समावेश आहे.

जिल्हा स्थीर मात्र काही तालुक्यांच्या चिंता वाढल्या..
जिल्ह्यात आज संगमनेरसह श्रीगोंदा, राहुरी व राहाता तालुक्यातील रुग्णगती पुन्हा एकदा जोरावर आली आहे. तर पारनेर, शेवगाव, नगर ग्रामीण, पाथर्डी, अहमदनगर महापालिका क्षेत्र व जामखेड तालुक्यातील रुग्णसंख्या बुधवारच्या तुलनेत कमालीची खालावली आहे. जिल्ह्यातील अकोले, कर्जत, नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यातील रुग्णसंख्येची बुधवारची सरासरी आजही टिकून आहे. सध्या जिल्ह्यातून दररोज 818.36 या सरासरीने रुग्ण समोर येत असून गेल्या 19 दिवसांत 15 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधीक सरासरी रुग्णवाढ संगमनेर तालुक्यातून होत असून येथून रोज 130 रुग्ण समोर आहेत. ऑगस्टमधील आत्तापर्यंतच्या 19 दिवसांत तब्बल 2 हजार 468 रुग्ण समोर आले असून यात अन्य तालुक्यातील काही रुग्णांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील दुसर्‍या स्थानावर असलेल्या पारनेर तालुक्याची दैनिक सरासरी 99 असून आत्तापर्यंत तेथून 1 हजार 878 रुग्ण समोर आले आहेत. यावरुन संगमनेर तालुक्यातील संक्रमणाचा वेग सहज लक्षात येतो.

आज शासकीय प्रयोशाळेचे 156, खासगी प्रयोगशाळेचे 383 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून 294 अशा जिल्ह्यातील एकूण 833 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर 227, श्रीगोंदा 113, पारनेर 94, अकोले, 50, राहाता 49, नगर ग्रामीण 45, शेवगाव 40, राहुरी 33, कर्जत व पाथर्डी प्रत्येकी 29, नेवासा 28, इतर जिल्ह्यातील 24, कोपरगाव 22, श्रीरामपूर 21, अहमदनगर महापालिका क्षेत्र 15, जामखेड 11, भिंगार लष्करी परिसर दोन व लष्करी रुग्णालय एक अशा 833 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 846 रुग्णांना आज उपचार पूर्ण केल्याने घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याचा जिल्ह्याचा सरासरी दर आता 96.09 टक्के असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 14 हजार 759 झाली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून कोविड बळींची संख्याही आता 6 हजार 420 झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 5 हजार 899 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यात संगमनेर तालुक्यातील 1 हजार 44 रुग्णांचा समावेश आहे. तर तालुक्यातील 417 जणांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे.

Visits: 199 Today: 2 Total: 1109439

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *