चंदनापुरी-शिरापूर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चंदनापुरी-शिरापूर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (ता.18) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 1 कोटी 74 लाख रुपये निधीतून या रस्त्याचे काम होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, सभापती सुनंदा जोर्वेकर, आर. बी. रहाणे, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, लक्ष्मण कुटे, रमेश गुंजाळ, सुभाष सांगळे, गणपत सांगळे, शंकर रहाणे, योगेश पवार, विजय रहाणे, भाऊराव रहाणे, हर्षल रहाणे, अनिल कढणे, कैलास सरोदे, संजय रहाणे, बालम सरोदे, आनंद कढणे, शांताराम कढणे, सोमनाथ काळे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश पवार यांनी केले तर भाऊराव रहाणे यांनी आभार मानले.
Visits: 127 Today: 1 Total: 1115034
