उंदीरगावच्या सरपंच-उपसरपंचाला कार्यालयात कोंडले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील उंदीरगाव येथील विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विविध मागण्यांसाठी कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांना बाहेरून कुलूप लावून कोंडून घेतले. अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके व योगिता निपुंगे यांनी उंदीरगाव ग्रामपंचायतीत कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नाही. तसेच केलेले काम हे चांगल्या दर्जाचे नाही. महिन्यापासून ग्रामस्थांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. चार महिने मशीन बसविले पण सुरू केले नाही. सार्वजनिक शौचालय 5 महिन्यांपासून बांधूनही नागरिकांना वापरण्यासाठी खुले केले नाही. या मागण्यांसाठी कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके हे लिपीक कार्यालयात असताना कोंडले गेले. अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले. या आंदोलनप्रसंगी दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक, मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे आदी उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 118631

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *