वरुडीपठार फाटा येथे वृद्धाची आत्महत्या

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील वरुडीपठार येथे एका वृद्धाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.5) सकाळी पावणे सात वाजेच्या पूर्वी घडली आहे. सोमनाथ खेमा गांडाळ (वय 75) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुंजाळवाडी पठार येथील सोमनाथ गांडाळ हे वृद्ध गुरुवारी सकाळी पावणे सात वाजेच्या पूर्वी वरुडीपठार फाटा येथील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत दिसून आले. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने तत्काळ ही माहिती पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांना दिली. त्यांनी याबाबत दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करत आहे. दरम्यान, सोमनाथ गांडाळ या वृद्धाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Visits: 123 Today: 2 Total: 1103338

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *