संतोष खाडे यांच्या पथकाची कामगिरी!  गुटख्याच्या साठ्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, अकोले
प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने तालुक्यातील  कोतुळ येथे छापा टाकून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला.  या टोळीकडून गुटख्याच्या  साठा व वाहनांसह तब्बल १ कोटी १ लाख ७४ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन गुटखा तस्करांसह १० आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एकूण १२ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर याबाबत अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाची अवैध धंद्याविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.पोलिसांना मिळालेला गुप्त बातमी नुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ही  कारवाई केली. या कारवाईत कोतूळ येथील नाचणठाव रोडवर असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये  हिरा पान मसाला व रॉयल  ७१७  तंबाखू चा मोठा  अवैध साठा आढळून आला.
या कारवाईत हिरा पान मसाला ११० पोते, रॉयल ७१७ सुगंधी तंबाखु ५० पोते यासह वाहने व रोख रक्कम असा १ कोटी १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई  रविवार दि. १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.पोलिसांनी या अवैध गुटखा  व्यवसायाचे तस्कर सोहेब सावीद काजी, शाहिद हुसेन लतीफ पटेल या दोघा गुटखा तस्करांबरोबर   इतर दहा  आरोपींना  ताब्यात घेतले आहे.  अवैध गुटखा व्यवसायावरील ही सर्वात मोठी कारवाई झाल्याने तालुक्यात हा दिवसभर चर्चेचा विषय होता.
वाळू तस्करी, गुटखा तस्करी यासारख्या अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कारवाई चालूच राहील अशी माहिती  पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी माध्यमांना दिली.
गेल्या आठ दिवसांपूर्वी याच गुटखा तस्करावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी देखील मोठा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यावेळी कारवाई न करता मोठ्या रकमेची आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा होती. त्यानंतर पुन्हा ही कारवाई झाल्याने स्थानिक पोलिसांच्या  भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी शोहेब शाबीद काझी, शाहीद हुसेन लतीफ पटेल, मतीन शबीर शेख, शहा नवाज जावेद काझी, परवेज युनूस शेख (सर्व रा. कोतुळ, ता. अकोले), साद अनवर तांबोळी (रा. अकोले), अतीक अनवर शेख (रा. समशेरपुर, ता. अकोले), शाहरुख जावेद काझी (रा. कोतुळ, ता. अकोले), सादिक पठाण (रा. अकोले), अमोल शरद जाधव (रा. अकोले), जुबेर युनुस शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), इम्रान रौफ शेख (रा. कोतुळ, ता. अकोले) तर अहिल्यानगर येथील शेख नुर अन्दुल रऊफ, (वय- ४२ वर्ष, रा. भिंगार, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर) व १४) आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख, रा भिंगार, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले आहे. संतोष खाडे यांच्या पथकाने  केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असले तरी स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे अकोले तालुक्यात अवैध धंदे सुसाट सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी याच गुटखा तस्करावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकला होता, त्यावेळी देखील मोठा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यावेळी कारवाई न करता मोठ्या रकमेची आर्थिक तडजोड झाली असल्याची चर्चा सुरू होती. या  मोठ्या रकमेच्या तडजोडीनंतर पुन्हा ही कारवाई झाल्याने स्थानिक पोलिसांच्या  भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Visits: 194 Today: 1 Total: 1414095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *